अशावेळी का कुणास ठाऊक पण नकळत आपण स्वतःलाच विचारू लागतो.. तू कोण आहेस? आस्तिक कि नास्तिक? खरच काय वाटत मला.
देवाच्या भरवश्यावर मी आजवर तरी काही सोडलेलं नाही. स्वतः मेहनत करून मिळवला सर्व पण मग मी कुठे देवाच अस्तित्व नाकारलं?? देवळात तर मीही जाते, कित्तीदा त्या मूर्तीशी वाद घातले, दोष दिले, संतापहि केला... आणि कधी कधी निरव मनःशांतीहि अनुभवली. पण साक्षात्कार कधी अनुभवला नाही... किंवा अनुभवला मी साक्षात्कारही... पण 'स्व' चा साक्षात्कार होता तो... स्वतःच्या कुवतीचा, कौशल्याचा, कर्तृत्वाचा साक्षात्कार होता तो..
चला देव आपल्याला दिसत नाही म्हणून आपण त्याच अस्तित्व नाकारुया पण मग ह्या सृष्टीचा रहाटगाडा चालतो तरी कसा? त्याच्या नसण्याचा तरी काय पुरावा?
आणि जरी देव असला तरी त्याला हे कर्मकांड पटत असेल का?
त्या नास्तिक बुद्धीवाद्याचे विचार मन उद्विग्न नक्कीच करतात पण मग हजारो च्या गीनतीन वारी ला जाणारा तो सर्व सामान्य वारकरी?? त्याची श्रद्धा? त्याच्या भावना? त्याचं काय? त्यांना थोडीच कळतात हे युक्तिवाद?
देव, धर्म , सत्य हे शब्द खूप मोठे आहेत खर तर.. त्यावर बोलण्याची अजून माझी कुवतही नाही. पण मला समजून घ्यायचंय हे सारं!
कोण विधाता? कुणाची निर्मिती? आणि कुणाचा साक्षात्कार?
माझाच मलाच झालेला साक्षात्कार??????
आपण त्याच्याकडे कित्ती अपेक्षा करतो त्याच स्वतः कडून केल्या तर??असो प्रश्न इतके आहेत पण उत्तर अजून माहित नाहीत...
शोध सुरु आहे... त्याचा! देवाचा!
👍👍👍👍
ReplyDelete