Total Pageviews

Thursday, October 13, 2011

दूर माझ्या गावी..

दूर माझ्या गावी..

उंबराच्या झाडा खाली ते घर माझं उभं असणार,
मागल्या दारी चुलीत निखारा अजून धगधगत असणार..
दूर माझ्या गावी ..
माय अजून निजली नसल,
पोर माझी नादान हाय म्हणत तिचा काळीज तुटत असल..
पारावरच्या गप्पात बापू लई बोलत असल,
पण लेकीच्या यादेत एकटाच मुसमुसून रडत असल..
जुन्याच माझ्या बुकात बहिणीला याद माझी सतावत असल,
मागल्या वर्षी धाडलेली राखी अजून बी भाऊ हातावर कुरवाळत असल..
दूर माझ्या गावी ..
खरच माय अजून निजली नसल.. :( :(

बाप नावाचं आकाश..

पोराच्या कलेवराजवळ तो धाय मोकलून रडत होता,
आसवांचा सागर त्याच्या डोळ्यातून ओसंडत होता..
पोराची थिजली बोट कधी ह्याच हातात सामावली होती,
ह्याच हाताचा हाथ धरून ती पावलं दुडू-दुडू धावली होती..
बालपणी कुशीत हाच लेक कधी शांत निजला होता,
वयात आल्यावर ह्याच मिठीत त्याला कर-कचून सामावला होता..
स्वतः cycle च्या वाऱ्या करून,
पोराला त्यांनी मोटार गाडी दिली..
स्वतः एक वेळ उपाशी राहून,
लेकाची प्रत्येक हौस पुरी केली..
काळाने आज घात केला,
नियतीचा डाव उलटला,
पाप-पुण्याच गणित त्याच आज चुकलं होत,
त्याच लेकरू आज आपल्या जीवाला मुकलं होत,
बाप नावच आकाश आज कोसळलं होतं...कोसळलं होतं...