Total Pageviews

Thursday, October 13, 2011

बाप नावाचं आकाश..

पोराच्या कलेवराजवळ तो धाय मोकलून रडत होता,
आसवांचा सागर त्याच्या डोळ्यातून ओसंडत होता..
पोराची थिजली बोट कधी ह्याच हातात सामावली होती,
ह्याच हाताचा हाथ धरून ती पावलं दुडू-दुडू धावली होती..
बालपणी कुशीत हाच लेक कधी शांत निजला होता,
वयात आल्यावर ह्याच मिठीत त्याला कर-कचून सामावला होता..
स्वतः cycle च्या वाऱ्या करून,
पोराला त्यांनी मोटार गाडी दिली..
स्वतः एक वेळ उपाशी राहून,
लेकाची प्रत्येक हौस पुरी केली..
काळाने आज घात केला,
नियतीचा डाव उलटला,
पाप-पुण्याच गणित त्याच आज चुकलं होत,
त्याच लेकरू आज आपल्या जीवाला मुकलं होत,
बाप नावच आकाश आज कोसळलं होतं...कोसळलं होतं...

No comments:

Post a Comment